Tuesday, April 12, 2011

गावठी चिकन




साहित्य : 
  • अर्धा /एक  किलो चिकन 
  • एक वाटी खवलेले नाहीतर किसलेले  खोबरे.
  • ४-५ पाकळ्या लसूण.
  • १ कांदा उभा चिरलेला.
  • अर्धी वाटी चिरलेली  कोथिंबीर 
  • १ चमचा हळद.
  • २ चमचे दही. 
  • २ मोठे चमचे तेल.
  • १ लहान पातेले  गरम पाणी.
  • २ मोठे चमचे लाल तिखट.
(वरील खोबरे , कांदा, लसूण कढईत भाजून घ्यावे हे मिश्रण गार झाले  की त्यात कोथिंबीर चिरून टाकावी आणि मिक्सर ला बारीक वाटून घ्यावे.)

कृती :
  • चिकन नीट साफ करून घ्या, त्याला हळद, मीठ , दही लावून अर्धा ते पाऊन तास बाजूला ठेवावे.पातेले गरम करायला ठेवावे, नंतर त्यात तेल टाकावे.
  • तेल गरम झाले की त्यात वरील मसाला मिश्रण टाकावे, थोडेसे भाजून घ्यावे.
  • मसाला भाजून झाला असेल तर त्यात हळद , मीठ , दही लावलेले चिकन टाकावे.
  • चिकन आणि मसाला छान परतून घ्या,चिकन थोडे गरम झले कि त्यात पातेले भरेल इतके  पाणी ओता.
  • उकळी येउ द्यावी ,१५ मि. नंतर लाल तिखट टाकावे.नंतर थोडे घट्ट होईपर्यंत शिजू द्यावे.
  • चिकन शिजले की, वरून कोथिंबीर पेरावी.
  • लाल झणझणीत गावठी चिकन ज्वारी, बाजरीच्या भाकरी आणि भातासोबत वाढावे.